Ad will apear here
Next
झुकझुक (विजेची) गाडी!


विजेवर चालणारी भारतातील पहिली रेल्वे गाडी मुंबईत बोरिबंदर ते कुर्ला स्टेशनपर्यंत धावली, त्या घटनेला आज (तीन फेब्रुवारी) ९५ वर्षे झाली.

तोपर्यंत केवळ कोळशाच्या इंजिनीवर रेल्वे धावत होती; पण १५०० वॉट (डीसी) क्षमतेच्या विजेच्या इंजिनावर रेल्वे चालली, हा ‘चमत्कार’ पाहायला संपूर्ण मार्गावर दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती.



काही काळातच मुंबईच्या ईशान्येला नाशिक व आग्नेयेला पुण्यापर्यंत तेव्हाच्या जीआयपी रेल्वेने प्रचंड क्षमतेच्या विजेच्या तारा टाकल्या व विजेवर चालणाऱ्या रेल्वेचे जाळे पुणे व नाशिकपर्यंत पोहोचले.

ही खरेच यांत्रिक क्रांती होती. कारण खंडाळ्याच्या व कसाऱ्याच्या घाटांत कोळशाच्या इंजिनाच्या रेल्वे गाड्या चालवणे कष्टांचे व धोकादायकही होते.



विजेवर चालणाऱ्या रेल्वेचा सर्वाधिक फायदा अर्थातच मुंबईकरांना झाला. कारण यामुळेच मुंबईकरांची ‘जीवनवाहिनी’ ठरलेली उपनगरी रेल्वे सुरू झाली. आज या लोकल गाड्यांतून दररोज ४५ लाख मुंबईकर प्रवास करतात.

... मात्र विजेच्या इंजिनाच्या रेल्वेने हळूहळू ‘झुकझुक झुकझुक आगीनगाडी’ला इतिहासाच्या पुस्तकातच ढकलले. आता ती केवळ गाण्यापुरतीच उरली आहे.

- भारतकुमार राऊत


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MUTWCV
Similar Posts
गुरूचा वाढदिवस! ज्याच्या पत्रिकेतील गुरू बलवान, तो आयुष्यात यशस्वी ठरतो व दुसऱ्यांवर प्रभुत्व गाजवतो, अशी समजूत आहे. अशा सर्वशक्तिमान गुरूला प्रणाम! ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी गुरू या सूर्यमालिकेतील सर्वांत मोठ्या ग्रहाचा शोध लावला तो आजच्याच दिवशी (सात जानेवारी) १६१० या वर्षी.
... आणि निनादली ‘तुतारी’! स्फूर्तीचे कवी कै. कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत यांनी लिहिलेली ‘तुतारी’ ही स्फूर्तिदायी कविता प्रथम प्रसिद्ध झाली, त्या घटनेला आज (२७ मार्च) १२८ वर्षे झाली.
१८५७च्या स्वातंत्र्यसमराची पहिली गोळी! ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतीयांनी उभारलेल्या १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची पहिली गोळी १६० वर्षांपूर्वी २९ मार्च रोजी कोलकात्याजवळील बराकपूर या लष्करी छावणीत झाडली गेली व काही दिवसांत सर्वत्र भडका उडाला.
बाळासाहेब : एक लेणे...! शिवसेनेचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी हा जन्मदिन. ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी जागवलेल्या त्यांच्याबद्दलच्या या आठवणी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language